सिंहगडावर भरदुपारी जीवघेणा हल्ला, युवकाची बोटं तोडून मैत्रिणीची सोनसाखळी पळवली..


पुणे : सिंहगडावर एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून त्याच्या मैत्रिणीची लूट करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सिंहगड किल्ल्याच्या आतकरवाडी पायी मार्गावर भर दुपारी हा प्रकार घडला. या प्रकारामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे आता पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विवेककुमार बाबुलाल प्रसाद (रा. हडपसर )असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

विवेककुमार व त्याची मैत्रीण आतकरवाडी पायी मार्गाने गडावरून खाली येत होते. तेव्हा झुडपात दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांना अडवले. त्यानंतर मैत्रिणीच्या गळ्यातील साखळी हिसकावून घेत असताना विवेककुमार याने प्रतिकार केला असता हल्लेखोराने त्याच्या हातावर कोयताने वार केले. यामध्ये त्याची बोटे तुटली.

यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. प्रसाद याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे मात्र सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!