Daund : मतदानाची माहिती पाहिजे असं खोटं सांगून महिलेच्या गळ्यातील 50 हजारांचे दागिने पळवले, दौंड तालुक्यातील घटना…
Daund : दौंड तालुक्यातील देऊळगावराजे येथे शेतात काम करत असलेल्या महिलांजवळ येऊन तुमची मतदानाची माहिती द्या असे म्हणत बोलण्याच्या नादात गुंतवून महिलेच्या गळ्यातील ५० हजाराचे सोन्याचे दागिने चोरून अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही माहिती दौंड पोलिसांनी दिली.
सविस्तर माहिती अशी की, देऊळगाव राजे येथील शेतकरी प्रमोद सुभाष काळे यांच्या शेतात शनिवारी (ता.२१) रोजी राणी मल्हारी बडगे व मुक्ताबाई लहु जाधव या महिला मजूर शेतातील कामे करीत होते.
दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या महिला जेवण्याकरीता शेताजवळ असलेल्या किसन गुलाबराव काळे यांच्या वखारीमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी एक काळ्या रंगाचा अंगात निळसर रंगाचा शर्ट व पांढऱ्या रंगाची पॅण्ट घातलेला वय अंदाजे 40 वर्षाचा एक अज्ञात व्यक्ती आला आणि दोघींनाही तुमच्याकडून मतदानाची माहिती हवी आहे असे म्हणून माहिती विचारू लागला. Daund
माहिती विचारून झाल्यानतंर थोड़ा वेळ थांबून अचानक दोघींच्याही गळ्यातील सोन्याचे मणी, मंगळसुत्र खेचून तेथून पळून गेला. शेतापासून लांब लावलेल्या त्याच्या मोटरसायकल वर बसून अंदाजे ५० हजार रुपये किंमतीचे गळ्यातील सोन्याचे दागिने घेऊन तो पसार झाला, याबाबत राणी बडगे हिने दौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरटवाविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दौड पोलीस पुढील तपास करीत आहेत.