Daund : धक्कादायक! अनैतिक संबंधातून जावयाने सासऱ्याला संपवलं, घटनेने दौंड हादरले…
Daund : गुन्हेगारीच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक समोर आली आहे. दौंडमध्ये जावयाने चाकूने भोसकून सासऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सुदाम हिऱ्या चव्हाण असं खून झालेल्या सासऱ्याचं नाव आहे. लकझऱ्या कोब्या काळे याच्यावर दौंड पोलिसांनी सासऱ्याच्या खूना प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील बोरीबेलमध्ये घडली आहे.
आपल्या पत्नीशी जावयाचे अनैतिक संबंध असल्याचा सुदाम यांना संशय होता. त्यांचे जावाई लकझऱ्या कोब्या काळे हे आपल्या सासरवाडीत बोरीबेल येथे आले होते. यावेळी जावई आणि सासरे सुदाम चव्हाण यांच्यात वाद झाला. संतापलेल्या जावयाने थेट सासऱ्याला चाकूने भोसकलं.
त्यानंतर सुदाम चव्हाण बेशुध्द पडल्याने नातेवाईकांनी जखमी झालेल्या चव्हाण यांना तत्काळ दौंड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितले. आरोपी लकझऱ्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
आठवडाभरात हत्येची ही दुसरी घटना …
आठवडाभरात हत्येची ही दुसरी घटना घडल्याने दौंड तालुका हादरला आहे. शनिवारी (ता.३) ऑगस्ट रोजी दौंड तालुक्यातील खामगांवमध्ये सूरज राहुल भुजबळ या तरुणाचा धारधार कोयत्याने वार करीत खून झाला होता. ही घटना ताजी असतानाचं दौंडमध्ये आता आणखी एक खूनाची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.