रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! ‘इतक्या’ दिवस दौंड-निजामाबाद एक्स्प्रेस अन् भुसावळ-दौंड डेमू रद्द…!


पुणे : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बेलापूर, चितळी आणि तांबा स्थानक (दौंड-मनमाड सेक्शन) दरम्यान नॉन इंटरलॉक, दुहेरीकरण व ब्लॉक बसविण्याचे रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतल्याने, १ ते २३ मार्च २०२३ या कालावधीत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत २३ मार्चपर्यंत दौंड-निजामाबाद एक्स्प्रेस, निजामाबाद. पुणे एक्स्प्रेस, भुसावळ- दौंड डेमू व दौंड भुसावळ डेमू या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे जबलपूर एक्स्प्रेस पुणे स्थानकातून ६, १३, २० मार्चलाआपल्या निर्धारित वेळेपेक्षा ३:५५ मिनिटे उशिरा सुटणार असून ही गाडी संध्याकाळी ३.२५ वाजता सुटणार आहे. ७, १४, २१ मार्चला पुणे लखनौ एक्स्प्रेस पुणे स्थानकातून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा ४:३० उशिरा सुटणार असून, ही गाडी दुपारी ३:२५ ला सुटणार आहे.

दरम्यान, १, ५, ८, १२, १५, १९ आणि २२ मार्चला पुणे हटिया एक्स्प्रेस पुणे स्थानकातून सुटणारी गाडी आपल्या निर्धारित वेळेपेक्षा ४:४० मिनिटे उशिरा सुटणार आहे. ही गाडी दुपारी ३:२५ वाजता सुटणार आहे. याशिवाय दि. ४, ११, १८ रोजी सुटणारी पुणे हटिया एक्स्प्रेस पुणे स्थानकातून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा ४.४० मिनिटे उशिरा सुटणार असून, संध्याकाळी ३:२५ वाजता सुटणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!