Daund News : वासुंदेत महाराष्ट्र बँकेच्या वसुली एजंट खूप प्रकरणाचा लागला छडा, १८ तासांच्या आत आरोपीला अटक, दौंड पोलिसांची कारवाई…


Daund News : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर पुण्यातील महाराष्ट्र बँकेच्या वसुली एजंटाचा धारधार हत्याराने भोसकून खून केल्याप्रकरणी दौंड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका संशयित आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे. अशी माहिती दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.

दिपक रामदास लोंढे वय – ३७ वर्षे (रा.वासुंदे ता. दौंड) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे येथील प्रवीण मळेकर (वय. ५८) हे बँकेत रिकव्हरीचे काम करत होते.

शुक्रवारी (ता. १) रोजी रात्री मोटारसायकलवरून बारामतीहुन घरी येथे जात असताना दौंड तालुक्यातील वासुंदेजवळ एका अज्ञाताने धारदार हत्याराने भोकसून त्यांचा खून केल्याची घटना घडली होती.

याप्रकणी मृत प्रवीण मळेकर यांचा मुलगा ऋषिकेश मळेकर यांनी दौंड पोलिसात दिली होती. त्यानुसार दौंड पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

मिळालेल्या माहिती नुसार, पोलीस निरीक्षक यादव यांनी तात्काळ आरोपीच्या शोध मोहिमेसाठी एक पोलीस निरीक्षक तीन पोलीस उपनिरीक्षक आणि १५ पोलीस कर्मचाऱ्यांची पथके तैनात केली होती. अवघ्या १८ तासाच्या आत आरोपीला पकडण्यात पोलीसांना यश आले. Daund News

दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासा संदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. तसेच या खुनाचा सखोल तपास करताना पोलीसांनी त्या रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी केली, अनेकांशी विचारपूस केली. सीसीटीव्ही फुटेज चेक केले.

यावेळी तपासात त्या परिसरातच राहणाऱ्या एका इसमाकडून वारंवार वाहनांवर दगडफेक तसेच हुज्जत घालण्याचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाली. घटनेचा सूक्ष्म तपास करताना पोलीसांनी श्वानपथक बोलावून आरोपीचा माग काढला.

या अगोदरही दगड मारणे, शिवीगाळ करणे असे प्रकार संबंधित आरोपी करत होता. काही तासांपूर्वीही आरोपीने एका गाडीवर दगड मारले होते. मागील एका गुन्ह्यात महिलेला आरोपीने धारदार हत्याराचा धमकी साठी वापर केला असल्याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या वाहनांमुळे मला त्रास होतो. जाणून- बुजून माझ्या अंगावर वाहने घालतात. असे सांगणाऱ्या आरोपीने त्रास होतोय या कारणावरून रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीस्वारासोबत वाद घालून हातातील धारदार सुरा मारला असून या घटनेत त्याचा जीव गेला. घटनेचा शोध लावत दौंड पोलिसांनी आरोपी दिपक लोंढे याला गुन्हा दाखल करून जेरबंद केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!