Daund News : खडकवासला जुना मुठा उजवा कालव्यासाठी १८८ कोटींचा निधी मंजूर, आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश, फडणवीसांचे मानले आभार…
Daund News : खडकवासला जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) च्या ६७ किलोमीटर लांबीच्या अस्तरीकरण व मजबूतीकरण या कामासाठी सुमारे १८८.७५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राहुल कुल यांच्या मागणीनुसार या निधीस मंजुरी दिली आहे.
तसेच दौंड येथे नवीन पोलीस स्टेशन इमारत, उपविभागीय पोलीस अधिकारी इमारत व पोलीस अधिकारी, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी सुमारे ५५.५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल बुधवारी आमदार राहुल कुल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. Daund News
दरम्यान, दौंड तालुक्याच्या जनतेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी आमदार जयकुमार गोरे हे देखिल उपस्थित होते.
Views:
[jp_post_view]