Daund News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून ऊसाच्या शेतातच पेटवले, दौंड तालुक्यातील धक्कादायक घटना..

Daund News : दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत, पतीने पत्नीला उसाच्य शेतात नेऊन, तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. उसाच्या शेतात अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने साडीला लागलेल्या आगीच्या भडका उडून ऊसाच्या शेतातही काही प्रमाणात आग लागली होती.

हि घटना शनिवारी (ता.६) दौंड तालुक्यातील मलठण येथे घडली आहे. याप्रकणी आरोपी पती विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Daund News
मिळालेल्या माहिती नुसार, गौरी उर्फ सुमन राहुल लोंढे या आपल्या पतीसोबत शनिवारी (ता. ६) पहाटे सहा वाजता शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. शेतात कांदा लागवडीचे काम चालू होते.

काम झाल्यावर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पती राहुल याने उसाला पाणी द्यायचे आहे, असे म्हटल्याने पत्नी उसाच्या शेजारी गेल्यावर पती राहुल यांनी काय समजायच्या आतच त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीमधून आणलेले पेट्रोल अंगावर टाकले व उसामध्ये ढकलून काडीपेटी लावून पेटवून दिले.

तसेच काही क्षणातच आगीच्या भडक्यामुळे साडीने पेट घेतला. यातून सावरत उसातून बाहेर आल्यावर पुन्हा पतीने तिला उसाच्या शेतात ढकलले, त्यावेळी तेथील उसाने देखील पेट घेतला होता.
पेटलेल्या उसात ढकलल्यामुळे ती पुन्हा ओरडत रस्त्याच्या कडेने पळाली. त्याठिकाणी आसपासचे लोक जमा झाल्याने लोकांच्या मदतीने उपचारासाठी तिला दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथून पुन्हा पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. Daund News
पत्नी गौरी उर्फ सुमन लोंढे हिचे पती राहुल विष्णु लोंढे हे सतत चारित्र्यावर संशय घेऊन तसेच घरगुती कारणांमुळे आणि ‘तू मला आवडत नाहीस’ या कारणांवरून पत्नीशी वाद घालत होते. शनिवारी त्यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.
याप्रकणी फिर्याद दिल्याने पती राहुल लोंढे यांच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पती राहुल लोंढे यालाही भाजले असल्याने त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.