Daund : मंडप व्यावसायिकांची शक्कल दौंड तालुक्यात दोन्ही उमेदवारांच्या सभेतून आली चर्चेत! एकाच मैदानावर दुसऱ्या सभेसाठी दुसऱ्या उमेदवाराच्या खुर्चा वापरल्या….
Daund वरवंड : विधानसभा निवडणुकांची सांगता सभा सोमवारी असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच अंतिम सभेसाठी उमेदवारांची मोठी धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच दौंड तालुक्यातील एक सभेतील एका गंमतीदार किश्शाने चर्चेला सुरुवात झाली आहे.
दौंड मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्यासाठी रविवारी म्हणजे (दि.१७) रोजी शरद पवार यांची सांगता सभा वरवंड या ठिकाणी होती. त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्यासाठी सांगता सभा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली यावेळी राहुल कुल यांच्या कडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
गंमतीशीर किस्सा म्हणजे राहुल कुल यांच्या सभेसाठी आणलेल्या 12000 खुर्च्या कमी पडल्याने त्याच ठिकाणी असलेल्या शरद पवार यांच्या सभेसाठी आणलेल्या अतिरिक्त खुर्च्या कार्यकर्त्यांनी वापरल्या त्यामुळे शरद पवारांच्या सभेतील खुर्च्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत कामाला आल्याची जोरदार चर्चा संपूर्ण दिवसभर दौंड विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाली. Daund
राहुल कुल यांनी सांगता सभेत जोरदार शक्ती प्रदर्शन करत जंगी सभा वरवंडच्या मैदानावर घेतली या सभेला लोटलेले अलोट गर्दी सर्वांच्या चर्चेचा विषय राहिले आहे. अनपेक्षित रित्या जमलेली ही गर्दी राहुल कुल यांना मोठ्या विजयाकडे घेऊन जाईल अशी शक्यता राजकीय जाणकार आता व्यक्त करू लागले आहेत.