मुलीचा खून, मृतदेहाच्या बाजूला हळद कुंकू!! वडिलांच्या धक्कादायक कृत्याने धाराशिव हादरले…

परंडा : तालुक्यातील शेळगाव येथे एका इसमाने दारूच्या नशेत असतानाच अवघ्या 9 वर्षांच्या मुलीची हत्या केली. यामुळे एकच खळबळ आहे. एवढंच नव्हे तर तिच्या मृतदेहाच्या आजूबाजूला हळदीकुंकू टाकण्याचा धक्कादायक प्रकारही घडला असून सगळेच अवाक् झाले. गौरी जाधव असे मृत मुलीचे नाव असून ती चौथ्या इयत्तेत शाळेत शिकत होती.
तसेच ज्ञानेश्वर जाधव असे आरोपी वडिलांचे नाव आहे. धारदार शस्त्राने मुलीवर वार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या बापाला, त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात आंबी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडीलांनी गौरीची कुऱ्हाडाचे वार करून निर्घृणपणे हत्या केली. ज्ञानेश्वर जाधव याला दारूचे व्यसन होते.
मृत गौरी ही लहान असतानाच तिची आई तिला सोडून गेली होती, तेव्हापासूनच तिच्या आजीनेच तिचा सांभाळ केला. त्यामुळे त्याची मुलगी गौरी ही तिच्या आजीकडे रहात होती. मात्र दारूच्या नशेमुळेच घात झाला आणि ज्ञानेश्वरने पोटच्या पोरीचा जीव घेतला. हे प्रकरण दडपण्यासाठी त्याने प्रयत्न केला. मुलीला मारलं हे कोणालाही सांगू नकोस अशी धमकीही ज्ञानेश्वरने गौरीच्या आजीला दिली होती.
नातीची हत्या झाल्याने आजीला मोठे दुःख झाले असून तिच्या शोकामुळे गावकरीही हळहळले आहेत. ज्ञानेश्वरला दारूचे व्यसन असून त्याचे नेहमी घरात भांडणे होत होती. याच रागातून त्याने हे भयानक कृत्य केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आंबी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत तपास सुरू आहे.
दरम्यान, मुलीला मारल्यानंतर त्याने मृतदेहाच्या कडेला हळदीकुंकू का टाकलं ? तसेच त्याने पोटच्या लेकीची हत्या नेमकी का, कोमत्या कारणामुळे केली हे समजू शकलेले नसून पोलीस अद्यार त्याप्रकरणी कसून तपास करत आहेत. यामुळे वेगळी माहिती समोर येते का? त्यादृष्टीने तपास सुरु आहे.