दर्शना पवारचा खूनच! पोस्टमार्टम रिपोर्टमधून ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

पुणे : पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली. दर्शना दत्तू पवार असे या मृत तरुणीच नाव असून ती नुकतीच एमपीएससी परिक्षेत पास झाली असून तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाल्याचेही माहिती मिळाली होती.

दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात तिच्या अंगावर जखमा आढळून आल्याने तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वेल्हे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.

राजगडच्या पायथ्याशी MPSC पास तरुणीचा मृत्यू, संशयास्पद गोष्टींनी गूढ वाढले

मिळालेल्या माहिती नुसार, दर्शना पवार आणि तिचा मित्र राहुल हांडोरे १२ जून रोजी दुचाकीवरून राजगड किल्ला परिसरात गेले होते. सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघे गडाच्या पायथ्याशी पोहचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली.
आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार; पुण्यात खळबळ
सकाळी दहाच्या सुमारस राहुल गडावरून एकटाच खाली आल्याचे धक्कादायक वास्तव राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही चित्रीकरणातून समोर आले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सिंहगडावर पर्यटकांची पळापळ, मुली वाचवा वाचवा म्हणून ओरडत होत्या, कारण..
तर तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता राहुलचे लोकेशन बाहेरच्या राज्यात असल्याचे समोर येत आहे. राहुल पसार झाल्यामुळे संशयाची सुई त्याच्याभोवती फिरू लागली आहे. जोपर्यंत तो ताब्यात मिळत नाही तोपर्यंत दर्शनाचा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला? हे समजू शकणार नाही.
