Dangal Actress Death : दंगल फेम अभिनेत्रीचे निधन, १९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, धक्कादायक माहिती आली समोर…

Dangal Actress Death : ‘दंगल’ चित्रपटात आमिर खानची धाकटी मुलगी बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे निधन झाले आहे. ती फक्त १९ वर्षाची होती. तिच्या अशा निधनाने तिच्या आई- वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, काही काळापूर्वी सुहानीचा अपघात झाला होता, त्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. सुहानीने उपचारासाठी घेतलेल्या औषधांचे असे दुष्परिणाम झाले की तिच्या शरीरात हळूहळू पाणी साचले. तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात बराच काळ दाखल करण्यात आले होते. Dangal Actress Death
मात्र तिच्या औषधोपचारांचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर तिने या जगाचा निरोप घेतला. उपचारादरम्यानच शुक्रवारी(१६ फेब्रुवारी) रात्री तिचं निधन झालं. शनिवारी (१७ फेब्रुवारी) फरीदाबाद येथे तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तिच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला असून बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सुहानीने ‘दंगल’ सिनेमातआमिर खानची मुलगी असलेल्या छोट्या बबिताची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तिने अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही काम केले होते.