बिपरजॉय वादळाचा गुजरातमध्ये कहर, २ ठार, अनेकजण जखमी, लाखोंचे स्थलांतर..

अहमदाबाद : सध्या बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकत असून याचा मोठा फटका बसत आहे.
हे वादळ जखौ किनारपट्टीला धडकल्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा प्रभाव कच्छ-सौराष्ट्र ८ जिल्ह्यांत राहिला.

अनेक ठिकाणी झाडे व खांब कोसळले. या वादळामुळे पिता-पुत्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आतापर्यंत या वादळामुळे गुजरातमध्ये २२ जण जखमी तर २३ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. अहमदाबादमध्ये राज्यभर मुसळधार पाऊस पडत आहे. ताशी ९० ते १२५ किमी वेगाने वारे वाहत आहेत. संपूर्ण मांडवीत १८ तासांपासून वीज नाही. यामुळे लोक त्रस्त आहेत.

दरम्यान, काल सायंकाळी ६.३० वाजता हे वादळ जखाऊ किनारपट्टीवर धडकले. वादळामुळे मेहसाणा, दाहोद, खंभात आणि भावनगरमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. त्याची लँडफॉल प्रक्रिया मध्यरात्री पूर्ण झाली.
यावेळी ताशी १२५ ते १४० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. यामुळे याची तीव्रता कधी कमी होणार याची अनेकजण वाट बघत आहेत.
भुजमध्ये ५ इंचापर्यंत पाऊस झाला आहे. द्वारका आणि भुजमध्ये वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.