Crime News : दाजी आणि मेव्हनी पळून गेली, पोलिसांनी पकडून कोठडीत ठेवलं, पण दोघांनी आत्महत्या केली, गावकऱ्यांनी थेट पोलीस ठाण्यालाच पेटवलं….

Crime News : बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे .विवाहित पुरुषाने आपल्या अल्पवयीन मेहुणीला आमिष दाखवून पळवून नेले. मग पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर हे दोघेही पोलिसांना सापडले.

तारावाडी पोलीस ठाण्यात पोलिसांनी या दोघांना अटक करण्यासाठी आणले, मात्र तिथे रात्री उशिरा दोघांनीही आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. या आत्महत्येने ग्रामस्थ संतापले.
तसेच पोलिसांनी दोघांनाही मारहाण केल्याचा ठपका ठेवत ग्रामस्थांनी पोलिसांच्या मारहाणीतच दोघांचा मृत्यू झाला असा आरोप केला आणि पोलीस स्टेशन समोर मोठी गर्दी जमा झाली. इकडे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी इतर कुमक मागवली तेव्हा मात्र ग्रामस्थ संतापले आणि त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. Crime News

ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याला आग लावली. यावेळी पोलिसांनी अनर्थ टाळण्यासाठी हवेत गोळीबार केला. यामध्ये एका महिलेच्या हाताला गोळी लागून महिला जखमी झाली, तर एका पुरुषाच्या पायाला देखील गोळी लागली असल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला नसून, तो थेट माणसांवर केला असा आरोप ग्रामस्थांनी केला.
दरम्यान, या घटनेमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रामकुमार सिंह यांच्यासहित पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. ज्या दोघांनी आत्महत्या केली, त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी उपलब्ध करत यामध्ये पोलिसांचा काहीच हात नव्हता, दोघांनी आत्महत्या केली अशा स्वरूपाची माहिती प्रसार माध्यमांना दिली. या घटनेची चर्चा सध्या बिहारमध्ये जोरात सुरू असून एकच खळबळ उडाली आहे.