Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, लोणी काळभोर येथील तरुणाला बेडया..

Crime News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार १ मार्च २०२४ ते ३१ मे २०२४ या कालावधीत पुणे शहर आणि परिसरात वेळोवेळी घडला आहे. Crime News
याप्रकणी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने शुक्रवारी (ता.३१) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन परमेश्वर राजाभाऊ देडे (वय.२१ रा. मोळे आळा, लोणी कालभोर, मुळ रा. नवीन रेणापुर नाका, आर्वी गायरान, लातुर) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीत मुलीसोबत ओळख केली. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान, त्यानंतर १ मार्च रोजी मुलीला पळवून नेले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.