Crime News : गुन्हे शाखा युनिट ६ ची दमदार कामगिरी! पुण्यात गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना ठोकल्या बेडया..

Crime News : पुणे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणावरून गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिली आहे.

साहिल राजु शेख, (वय.२४, रा. ३८, मॅजेस्टिक पार्क, बी बिल्डिंग, फ्लॅट नं. 1206 वडाची वाडी रोड, उंड्री) व जैद जावेद खान (वय. २२ रा. धंदा फ्लॅट नं 203 गणराज स्वप्नपुर्ती फेज-२ हांडेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
दरम्यान, यातील साहिल शेख याच्याकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे, तर जैद खान याच्याकडून दोन देशी बनावटीचे लोखंडी अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. Crime News

नेमकं घडलं काय?
विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेशाने कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी गुन्हे प्रतिबंधक कारवाई, तसेच बेकायदेशीर हत्यार, अग्निशस्त्र वापरणारे यांचे विरोधात कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले होते. सदर आदेशाचे अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 6 चे कार्यक्षेत्रात ७ नोव्हेंबर रोजी गस्त घालीत असताना काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आल होता.
त्यानुसार आरोपी साहिल शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली होती. सदर गुन्ह्याच्या अधिक तपासादरम्यान रविवारी (ता.१०) जैद खान याचे कडुन कौशल्यपूर्व तपास करून दोन देशी बनावटीचे लोखंडी अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.