Crime News : माचिस दिली नाही म्हणून एकाची हत्या, घटनेने उडाली खळबळ..

Crime News : राज्यात गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

माचिस दिली नाही म्हणून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. Crime News
मोहम्मद आली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, प्रसाद भानुशाली असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार,नवी मुंबईतील नाका या ठिकाणी एका कंपनीच्या गेटवर सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाऱ्या प्रसाद भानुशाली याला आरोपी मोहम्मदने माचीस आहे का? असे विचारले. त्यावर त्याच्याकडे माचीस नसल्याचे सांगत प्रसादने नकार दिला.
यावरून मोहम्मद आणि प्रसाद यांच्यात वाद झाला. यामध्ये मोहम्मदने प्रसादच्या डोक्यात दगडाचा मारा करुन त्यांची हत्या केली. याप्रकरणी तुर्भे पोलिसांनी आरोपी मोहम्मद आलीला अटक करत करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.