Crime News : ट्रेनच्या टॉयलेटमध्ये दीड महिन्याच्या बाळाला टाकून पालक पसार, धक्कादायक घटना झाली उघड…


Crime News : देशात नवजात बाळांना उकीरड्यावर टाकून देणाऱ्यांची विकृती काही कमी व्हायला तयार नाही. राज्यात असाच एक संतापजनक प्रकार घडला आहे. अवघ्या एका महिन्याच्या बाळाला ट्रेनच्या शौचालयात टाकून अज्ञात पालक पसार झाल्याची घटना घडली आहे.

मुंबई-देवगिरी एक्सप्रेसमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेच्या टॉयलेटमध्ये एक-दीड महिन्यांची मुलगी झोपलेली आढळल्याने संपूर्ण प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.

देवगिरी एक्सप्रेसने औरंगाबाद स्थानक सोडल्यानंतर बाथरूममधून मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर प्रवाशांनी चौकशी केली. यामुळे बाळ एका कमोडच्या शेजारी झोपलेले सापडले. हा प्रकार उघडल्यावर सर्व प्रवाशांना धक्का बसला आहे. Crime News

मनमाड पोलिसांनी अज्ञात पालकांविरोधात तक्रार दाखल केली आहे आणि बाळाला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे देशभरात नवजात बाळांची अशी दुर्दशा करणाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. पालकांच्या निष्ठुरतेचा कळस असलेल्या या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!