Crime News : धक्कादायक! नातेवाईकांना कॉल केला, अन् नंतर पत्नीसह मुलालाही संपवलं, नेमकं घडलं काय?


Crime News : एका बिझनेसमनने त्याची पत्नी आणि सात वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचे उघड झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.

पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी बिझनेसमन घरातून फरार झाला आहे. दीपक गायकवाड असे आरोपीचे नाव असून त्याने पत्वी अश्विनी आणि सात वर्षांच्या मुलाचे आयुष्य संपवले. दरम्यान ही हत्या नेमकी का झाली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. Crime News

या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी दीपक गायकवाड याचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी दीपक गायकवाड हा पत्नी आणि मुलासह कल्याण पश्चिमेकडील रामबाग लेन नंबर तीनमधील एका इमारतीत रहात होता. त्यांचे कल्याण शहरातच नानूज वर्ल्ड नावाचे खेळण्यांचे दुकान आहे. काल दुपारी दीपक याने त्याच्या एका नातेवाईकाला फोन केला होता.

त्यांच्याशी बराच वेळ फोनवरून बोलणंही झालं. मात्र त्यानंतर अचानक काय झालं माहीत नाही, पण त्याने त्याची पत्नी आणि लहान मुलाचा गळा दाबून, दोघांची हत्या केली. एवढेच नव्हे तर त्याने स्वत:चं आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला. मात्र थोड्या वेळाने तो घटनास्थळावरून फरार झाला.

दरम्यान, फोन केल्यानंतर दीपकचे नातेवाईक जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांचे डोळेच विस्फारले, ते सगळेच हादरून गेले. घरामध्ये गायकवाड याची पत्नी आणि लहान मुलाचा मृतदेह होता. तर हत्येनंतर दीपक गायकवाड फरार झाला.

हादरलेल्या नातेवाईकांनी कसाबसा धीर गोळा करत महात्मा फुले पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले . पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!