Crime News : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, चोरीच्या संशयातून भोंदूबुवासमोर पत्नीची विवस्त्र पूजा…


Crime News : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

चोरीच्या संशयावरून भोंदूबुवासमोर पत्नीची विवस्त्र पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार पन्हाळा तालुक्यातील एका गावात घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर संबंधित महिलेने फिर्यादी दिली.  Crime News

त्यानुसार पन्हाळा पोलिसांनी अमानुष, अनिष्ट व अघोरी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत भोंदूबुवा रामू कोलकर ऊर्फ रामा मिस्त्री याच्यासह पती आणि सासूवर गुन्हा नोंद केल्याचे पन्हाळा पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.

मिळालेल्या माहिती नुसार, चार वर्षांपूर्वी घरातील सोन्याची चेन चोरीस गेली होती. त्याची चौकशी करण्यासाठी पीडितेचा पती भोंदूबुवाकडे गेला. तेव्हा त्याने ती चेन तुझ्या पत्नीने चोरून तिच्या आईला दिली आहे, असे सांगितले. दुसरीकडे भोंदूबुवा पीडितेकडे शरीर संबंधाची मागणी करीत होता. त्याला तिने दाद दिली नाही.

दरम्यान, एक दिवस पतीने पीडितेला चोरीचा जाब विचारला व या संशयाची शहानिशा करण्यासाठी भोंदूबुवाच्या मदतीने पूजा करण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने आईला सोबत घेऊन भोंदुबुवासमोर पत्नीची विवस्त्र पूजा केली. याप्रकणी महिलेने पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार ऑगस्टमध्ये घडला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!