Crime News : आधी शाळकरी मुलीची काढली छेड, नंतर मित्रांनी दहशत करत आईचाही केला विनयभंग, मुलीने घेतला टोकाचा निर्णय…
Crime News : राज्यात दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत.
तसेच सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत.
सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगवी परिसरातील एका १५ वर्षीय शालेय विदयार्थीनीने युवकाकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून घरामधील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन जीवनयाञा संपविल्याने सांगवी परिसरात खळबळ उडाली आहे.
पोपट लांडगे (वय. २०,रा. खंडाळा ता. खंडाळा) असे आरोपीचे नाव आहे.
आत्महत्या केलेल्या विदयार्थीनीने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाईट नोटमधील युवकांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीकरीता नातेवाईकांनी व सांगवी ग्रामस्थांनी सदरील विदयार्थीनीचा मृतदेह शिरवळ पोलीस स्टेशनला नेऊन ठिय्या मांडला. Crime News
बुधवारी (ता. २९) नोव्हेंबर रोजी संबंधित शालेय विदयार्थीनी ही पायी घरी जात असताना शिरवळ ते नायगाव जाणा-या वसतिगृहाजवळील रस्त्यावर दुचाकीवरुन आलेल्या अक्षय लांडगे याने संबंधित विदयार्थीनीचा विनयभंग केला. याची तक्रार शिरवळ पोलीस स्टेशनला संबंधित विदयार्थीनीने दिल्यानंतर संबंधितांविरुध्द विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
त्यानंतर अक्षय लांडगे याला शिरवळ पोलीसांनी जेरबंद केले, मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर दुस-या दिवशी गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केल्याच्या रागातून अक्षय लांडगे याच्या दोन मिञांनी संबंधित विदयार्थीनीच्या घरी जाऊन दहशत निर्माण केली. तेवढ्यात न थांबता विदयार्थीनीच्या आईचा विनयभंग केला, याची तक्रार शिरवळ पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती.
या साऱ्या प्रकाराने संबंधित विद्यार्थिनी अत्यंत तणावाखाली होती. काल सांगवी (ता.खंडाळा) येथे विदयार्थीनीचे वडील हे लघुशंकेसाठी उठले असता त्यांना विदयार्थीनीने घराच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
यावेळी संबंधित विदयार्थीनीला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डाँकटरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असता, नातेवाईक व सांगवी ग्रामस्थांनी संबंधित मृतदेह रुग्णवाहिकेमधून सुसाईड नोटमधील संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.