Crime News : आपण डॉन झालो आणि किंमत देत नाही? मोक्का लागलेल्या डॉनने केली तरुणाला बेदम मारहाण, धक्कादायक प्रकार समोर…


Crime News : सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. रोज याबाबत धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. असे असताना आता आपल्याला एवढा मोक्का लागला मोक्कामुळे क्राईम क्षेत्रात प्रतिष्ठा वाढली, पण केवळ हाच किंमत देत नाही म्हणून या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या युवकास आठ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. Crime News

यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. या संदर्भात फरासखाना पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून हा प्रकार शुक्रवारी दुपारी मंगळवार पेठेतील भर्तरीनाथ मठाजवळ घडला.

याबाबत माहिती अशी की, आंबेगाव येथील सौरभ विजय कट्टीमनी यांनी तक्रार दाखल केली आहे. हडपसरचा यश प्रदीप जावळे, गणेश उर्फ टमाटा, प्रतीक शिंदे, सुरज रमेश पंडित व इतर चौघाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केली आहे. Crime News

शुक्रवारी दुपारी सौरभ कट्टमणी हे भर्तरीनाथ मठामध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. याचवेळी आपल्याला नीट किंमत देत नाही, एवढ्या गंभीर गुण्यातून सुटलो असून, आपण डॉन आहोत, तरीही आपल्यापुढे हा झुकत नाही म्हणून हे आठ जण त्या ठिकाणी आले.

त्यांनी सौरभ यांना दुसाकीवर जबरदस्तीने बसवून हडपसरच्या महंमदवाडी स्मशानभूमी जवळील मैदानावर नेले. त्याठिकाणी आणखी दोघांना बोलावून घेतले आणि केबल कमरेच्या बेल्टने व दगडाने आणि लाथा बुक्क्यांनी त्यांना मारहाण केली.

तसेच सौरभ यांच्या खिशातील पाच ते सहा हजार रुपये काढून घेतले. यामुळे पुन्हा एकदा दहशद पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यातून दिसून आले आहे. यामुळे कायद्याचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!