Pune Crime News : दिराचे भयंकर कृत्य! वहिनीची हत्या केली अन् मृतदेह…खुनाचे कारण आले समोर..

पुणे : पोलिसांत तक्रार दिली होती म्हणून मनात राग असलेल्या दिराने स्वतःच्या वहिनीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मावळातील चांदखेड येथून समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मृत्यू झालेल्या महिलेचा भाऊ शाम नामदेव चव्हाण (वय २८, रा. भोर, पुणे ) यांनी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लक्ष्मण रामभाऊ चव्हाण (वय ३२ ) व तसेच महिला आरोपी यांना अटक केली आहे. तर गणेश उर्फ लहू रामभाऊ चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बहिणीचा फोन लागत नाही तसेच ती घरी नाही म्हणून मयत महिलेच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सासरच्यांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली असता हा सारा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी गणेश हा मयत महिलेचा दिर होता.
त्याच्या विरोधात मयत महिलेने तीन वर्षापुर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक केले होते. हा राग मनात धरून आरोपीने स्वतःच्या वहिनीच्या डोक्यात दगड घालून खून केला व पुरावा नष्ट कऱण्यासाठी त्यांचा मृत्यूदेह चांदखेड य़ेथील डोंगरा लगत जमिनीमध्ये पुरला होता.
दरम्यान, सर्व सत्य समोर येताच पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या असून याचा पुढील तपास शिरगाव परंदवाडी पोलीस निरीक्षक करत आहेत.