Crime News : धक्कादायक! क्रिकेट खेळण्यावरून वाद जीवाशी बेतला, पोलीस हवालदाराची हत्या…

Crime News : राज्यात सध्या गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रतिस्पर्धी संघांमधील क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादात पोलीस हवालदाराचा खून करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघातील खेळाडूंमध्ये हा वाद झाला. कॉन्स्टेबल शुभम अगोणे यांच्यावर प्रतिस्पर्धी संघाच्या सदस्यांनी तलवारी आणि क्रिकेट स्टंपने हल्ला चढवला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. Crime News

याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलीय. १२ जणांविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्न यासह विविध गुन्ह्यांसाठी एफआयआर नोंदवण्यात आली आहे. सोमवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांनी त्यांना रविवारपर्यंत सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, शुभम अगोणे हे सुट्टीवर आले होते. पण त्यांची हि सुट्टी अखेरची ठरली आहे. ते चाळीसगाव शहारातील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूनं गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.