Crime News : द्रव पाजले, इंजेक्शन दिले, कॉन्टेबल विशाल लढतच राहिला, पण तीन दिवसांनी घडलं धक्कादायक, घटनेने उडाली खळबळ…


Crime News : अज्ञातांनी मुंबई पोलीस शिपायाला विषारी इंजेक्शन दिले, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. ३० वर्षीय हवालदार विशाल पवार हा ठाण्यात राहत होता. काही दिवसांपूर्वी चोरट्यांच्या टोळीने त्याला रेल्वे रुळाजवळ विषारी द्रव्य टाकून मारले होते.

विशालला विषारी इंजेक्शन दिले…

त्याचा चोरीला गेलेला फोन परत घेण्यासाठी विशाल त्याच्याकडे गेला होता. मात्र माल परत करण्याऐवजी त्याने विशालला विषारी इंजेक्शन दिले. यानंतर विशालची प्रकृती खालावल्याने त्याला ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पण तीन दिवसांनंतर १ मे रोजी तो जीवनाच्या लढाईत हरला. २८ एप्रिल रोजी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. लोकल ट्रेनमधून ड्युटीसाठी जात असताना पवार साध्या वेशात होते. Crime News

पवार लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहून फोनवर बोलत असताना आरोपीने त्यांच्या हातावर अचानक हल्ला केला. त्यामुळे त्यांचा मोबाईल खाली पडला. एका आरोपीने फोन उचलला आणि रुळांमधून पळू लागला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!