Crime News : राजकारणात खळबळ!! पुण्यात भाजप कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून खून…


Crime News : ऐन निवडणूकीच्या धामधुमीत आणि दिवाळी सणाच्या काळात मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

ही घटना शुक्रवारी (ता.१) नोव्हेंबर रोजी प्रभाचीवाडी परिसरात घडली आहे. निलेश दत्तात्रय कडू (वय. ३०, रा. सावंतवाडी, महागाव, ता. मावळ, जि. पुणे) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, निलेश दत्तात्रय कडू भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी होते. त्यांच्या खूनामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच लोणावळ्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र मायने, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेत त्याठिकाणी चौकशी केली आहे. Crime News

दरम्यान, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!