Crime News : आदिवासी मुलीवर बलात्कार करून केली हत्या, गोंदियातील घटनेने सगळे हादरले, भयंकर माहिती आली समोर…


Crime News : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गोंदिया जिल्ह्यात एका १२ वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ एप्रिल रोजी घडली.

या घटनेतील अज्ञात आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. तसेच या घटनेच्या निषेधार्थ काही आदिवासी संघटनांनी देवरी उपजिल्हा दंडाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवार व बुधवारी निदर्शने करून दोषीला लवकर अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. Crime News

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी सहावीत शिकत होती. १९ एप्रिल रोजी ती तिच्या आई-वडिलांसोबत देवरी तालुक्यातील गोतनपार गावात एका नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी गेली होती. तेथून अज्ञात व्यक्तींनी तिचे अपहरण केल्याचा आरोप आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, जेव्हा मुलगी सापडली नाही तेव्हा तिच्या पालकांनी तिचा शोध सुरू केला. दरम्यान, २० एप्रिल रोजी गोतनपार गावाजवळील ढवळखेडी जंगलात पीडितेचा विकृत मृतदेह आढळून आला होता. माहिती मिळताच चिचगड पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि गुन्हा दाखल केला.

दरम्यान, घटनेला पाच दिवस उलटूनही अटक न झाल्याने बुधवारी काही स्थानिक आदिवासी संघटनांच्या सदस्यांनी उपजिल्हा दंडाधिकारी कार्यालयात निदर्शने करून निवेदन दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!