रत्नागिरी – सिंधुदुर्ग निवडणूकीवर विनायक राऊत उच्च न्यायालयात , नारायण राणे यांना कोर्टाचे समन्स ….

Ratnagiri : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी दाखल केलेल्या निवडणुकीबाबतच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने भाजप खासदार नारायण राणे यांना आज (दि.१६) समन्स बजावले आहे.
विनायक राऊत यांनी आपल्या याचिकेत नारायण राणे यांची लोकसभेची निवडणूक रद्दबातल ठरवण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना समन्स बजावले आहे. त्यावर १२ सप्टेंबरला उत्तर सादर करायचे आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली
नारायण राणे यांची खासदारपदी निवड रद्द करारत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी तसेच त्यांच्यावर 5 वर्ष निवडणूक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी घालण्यात यावी, याबाबत ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी अॅड. असीम सरोदे, अॅड, किशोर वरक, अॅड. श्रीया आवले यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे.
निवडणूक प्रचार कालावधी दि.5 मे रोजी संपुष्टात आला. त्यानंतरही भाजप कार्यकर्त्यांनी दि. 6 मे रोजीसुद्धा नारायणराणे यांचा प्रचार करीत होते. राणेच्या समर्थकांनी प्रचार संपलेला असताना ईव्हीएम मशीन दाखवून राणे साहेबांनाचमत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सर्व गोष्टीचीमाहिती नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.