कोरोना अजूनही आहे! राज्यातील 30 टक्के सक्रीय रुग्ण पुणे जिल्ह्यात…!


पुणे : कोरोना अजूनही राज्यात सक्रिय आहे. सध्या राज्यात 1364, तर जिल्ह्यात 411 सक्रिय रुग्ण असून राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांच्या तुलनेत 30 टक्के रुग्ण फक्त पुणे जिल्ह्यात आहेत. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

 

मार्च 2020 मध्ये महाराष्ट्रातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात आढळला होता. त्यानंतर कोरोना महामारीच्या प्रत्येक लाटेमध्ये पुणे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले. यामध्ये अनेकांचे जीव देखील गेले.

 

जून 2022 नंतर कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीयरीत्या घटली. कोरोनाची ‘पँडेमिक’कडून ‘एंडेमिक’कडे वाटचाल सुरू झाल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

 

कोरोना रुग्णसंख्या वाढत नसली तरी कोरोना आणि एच 3 एन 2 अशा दोन्ही विषाणूंचा संसर्ग एकाच वेळी वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!