पुणे मनपावरून वाद पेटणार ; प्रभाग रचनेचा राष्ट्रवादीला फटका, शिवसेना- भाजपला फायदा


पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर कऱण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वर्चस्व असलेल्या प्रभागात बदल केल्यामुळे त्यांना या निवडणुकीत फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.यामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभागरचनेत मोठे बदल कऱण्यात आलेले नाहीत. उपनगरात मात्र फेरबदल करण्यात आलेत…या प्रभागरचनेचा भाजप आणि शिंदेसेनेला फायदा होणार आहे..

आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकूण 41 प्रभाग आहेत.यात ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय आहे. एकूण ४१ प्रभागांपैकी प्रभाग क्र. ३८ हा ५ सदस्यीय असून उर्वरित ४० प्रभाग ४ सदस्यीय आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३४,८१,३५९ इतकी असून अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,६८,६३३ इतकी आहे, व अनु सूचित जमातीची लोकसंख्या ४०,६८७ इतकी आहे. तसेच निवडून द्यावयाच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या १६५ आहे.

दरम्यान करावा, पर्वती, कोथरूड, शिवाजीनगर या मध्यवतीं भागातील विधानसभा मतदारसंघांतील प्रभागांची संख्या कमी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे..दुसरीकडे उपनगरांतील प्रभाग मोठे केल्यानं नगरसेवकांची संख्या वाढण्यावर मर्यादा आली आहे. त्याचाच फटका अजितदादांच्या राष्ट्रवादीला बसणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!