शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस आमदारास जीवे मारण्याची धमकी


 

नाशिक : नाशिकमध्ये बाजार समिती निवडणुकीतल्या प्रचारावरून काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना शिंदे गटाच्या चुंबळे पिता-पुत्राकडून धमकीचे फोन आलेत. त्यामुळे खोसकर यांनी उद्विग्न होत चक्क आत्महत्या करण्याचा इशारा दिला. यावेळी त्यांना रडू आवरले नाही. या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हिरामण खोसरकर यांनी या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. खोसकर हे सध्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार आहेत. मात्र, आमदार खोटे बोलत आहेत. ते कलाकारांपेक्षा मोठे आहेत. उलट त्यांनी आमच्या उमेदवाराला धमकावले, असे म्हणत चुंबळे पिता-पुत्रांनी हे आरोप फेटाळून लावलेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!