कॉक्रोच जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनाचा एल्गार; पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग


पुणे : कॉक्रोच जनता पार्टीने २० जुलै रोजी जंतरमंतर ते संसदेपर्यंत मोर्चा पुकारला होता. आता कॉक्रोच जनता पार्टीकडून २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनात अनेक विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी शांततापूर्ण मार्गाने सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पुणे शहर वाहतूक पोलिसांनी एक्सवर अधिकृत पोस्ट शेअर करत सांगितले की, आज नियोजित मोर्चा आणि आंदोलनाच्या अनुषंगाने काही प्रमुख मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

मोर्चाची सुरुवात लाल महाल येथून होणार असून, फडके हौद, दारुवाला पूल, नरपतीगिरी चौक, बेलबाग माता मंदिर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

वाहतुकीतील तात्पुरते बदल :

🔹 गणेश रोड – पर्यायी मार्ग : लक्ष्मी रोड
🔹 केळकर रोड – पर्यायी मार्ग : सूर्या हॉस्पिटल – १५ ऑगस्ट चौक मार्ग
🔹 शिवाजी रोड – पर्यायी मार्ग : एबीसी चौक – फुटका बुरूज मार्ग
🔹 नेहरू रोड – पर्यायी मार्ग : जंगली महाराज रोड / नदीपात्र मार्ग / टिळक रोड – बॅनर्जी चौक – नेहरू मेमोरियल मार्ग

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना प्रभावित मार्ग टाळून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. सध्या वाहतुकीतील या बदलांची माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!