मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे सभेतच भावूक, मुलगा श्रीकांतने दिला आधार, नेमकं कारण काय…?
ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे अचानक भावूक झाल्या. यामुळे नेमकं काय झालं हे कोणाच्या लक्षात येत नव्हते. ठाण्यातील एका कार्यक्रमात उपस्थितांनी हा प्रसंग अनुभवला. यामुळे याची चांगलीच चर्चा झाली आहे.
याचे कारण म्हणजे शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये शंकर महादेवन यांनी गायलेलं एक गाणं. शंकर महादेवन यांची नुकतीच एक काँसर्ट अंबरनाथमध्ये पार पडली. या कॉन्सर्टमध्ये तारे जमीन पर चित्रपटातील ‘माँ’ हे गाणं गायल. यामुळे त्या भावूक झाल्याचे दिसून आले.
आई भावूक झाल्याचे पाहून खासदार श्रीकांत शिंदे हे स्वतः आईजवळ जाऊन बसले. यावेळी हे दोघेही भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. याचे फोटो व्हिडिओ सध्या व्हायरल झाले. यावेळी खासदारांच्या पत्नी वृषाली शिंदे यादेखील भावनिक झाल्या होत्या.
सदैव कामात व्यग्र असल्यामुळे आई आणि माझी नियमित भेट होत नाही. कधी तरी असे काही क्षणच आम्हाला सोबत घालवायला मिळतात. आम्ही तारे जमीन पर चित्रपट पाहायला गेलो होतो, तेव्हा तर आई पूर्णवेळ रडत होती, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.