CM N Biren Singh : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला, २ जखमी, नेमकं कुठे घडली घटना?

CM N Biren Singh : मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिरीबाममध्ये उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी सुरक्षारक्षक गेले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर काही उग्रवाद्यांनी हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एन बीरेन सिंह मंगळवारी हिसाचारग्रसत जिराबाम जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जाणार होते. त्यापुर्वी त्यांच्या आगाऊ सुरक्षा दलावर आज सकाळी हल्ला करण्यात आला यात दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर मणिपूर पोलिस कमांडो आणि आसाम रायफल्सने एक संयुक्त पथक तयार केले असून गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. उल्लेखनीय आहे की मंगळवारी मुख्यमंत्रीएन बीरेन सिंह हिंसाचारग्रस्त जिरीबामला भेट देणार होते. CM N Biren Singh
या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे आगाऊ सुरक्षा पथक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिरीबाम येथे जात होते. दरम्यान, अतिरेक्यानी सिनमजवळ हल्ला केला. मुख्यमंत्री एन बीरेन सिंहयांनी या हल्ल्याचा निषेध केला असून, हा निरपराधांवर केलेला रानटी हल्ला आहे, असे ते म्हणाले. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.