आकाशात गुप्तपणे हेरगिरी करणाऱ्या चीनच्या फुग्याला अमेरिकेने लढाऊ विमानांनी खाली पाडले..!
वाॅशिंग्टन : अमेरिकेच्या लढाऊ विमानाने शनिवारी एका संशयित चिनी गुप्तहेर फुग्याला दक्षिण कॅरोलिनाच्या किनारपट्टीवरून खाली पाडल्यानंतर काही वेळातच या घटनेच्या नेमक्या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
अमेरिकन फायटर जेटने एका संशयित चिनी गुप्तहेराचा बलून एका फटक्यात कसा पाडला, हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अमेरिकन हल्ल्यानंतर फुग्याचे तुकडे होऊन ते समुद्रात पडले.
यांचदरम्यान रिअल फोटोहोलिक नावाच्या इंस्टाग्राम वापरकर्त्याने कॅप्चर केलेला हा व्हिडिओ, अमेरिकेतील लँगली एअर फोर्स बेसवरून F-22 फायटर जेटने डागलेल्या क्षेपणास्त्राने खाली पाडलेला चिनी पाळत ठेवणारा बलून स्पष्टपणे दाखवला आहे.
Views:
[jp_post_view]