पुण्यात वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी केला योगाभ्यास, भक्ती-शक्तीच्या संगमात हजारो वारकरी सहभागी….

पुणे : आज जागतिक योगा दिवस असल्याने मोठ्या उत्साहात सगळे योगा करत आहेत. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हजारो वारकऱ्यांनी योगा केला यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.ते म्हणाले, अलौकिक अनुभव. आषाढी वारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी दाखल झाल्या आहेत.
यंदा त्याचवेळी जागतिक योग दिन आला असल्याने उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका, राष्ट्रीय सेवा योजना, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र देहू, विद्यार्थी विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात अलौकिक भक्तीयोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत लाखो वारकऱ्यांनी योगाभ्यास केला. आजचा हा भक्ती-शक्तीचा संगम असलेला कार्यक्रम वेगळीच अनुभूती देणारा होता. या कार्यक्रमास मंत्रिमंडळातील माधुरीताई मिसाळ, मेधाताई कुलकर्णी, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सदानंद मोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंहउपस्थित होते.
तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अशोक उबाळे यांच्यासह देहू-आळंदी देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी आणि प्रमुख दिंड्यांचे दिंडी प्रमुख, सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.