बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा ताबा! चित्रपटाच्या कमाईबाबत सर्वात मोठी अपडेट आली समोर…

मुंबई : विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘छावा’ चित्रपट कमाल करत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहेत.

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या अभिनयासोबतच सिनेमात संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
१४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रारंभिक काळात बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती. सिनेमाने पहिल्या आठवड्यात २२५.२८ कोटींची कमाई केली, तर दुसऱ्या आठवड्यात या आकड्यात आणखी भर पडली आणि ४११.४६ कोटींची कमाई केली.

मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सिनेमाच्या कमाईमध्ये घट होत आहे. रिपोर्टनुसार, तिसऱ्या आठवड्यात सिनेमाची कमाई मंदावली आहे. सिनेमाने २१ व्या दिवशी ५.३५ कोटींची कमाई केली, आणि यामुळे आतापर्यंतची एकूण कमाई ४९६.२४ कोटीं झाली आहे.
दरम्यान, यामुळे सिनेमाला ५०० कोटींचा आकडा पार करणं जवळपास निश्चित होईल, परंतु सनी देओल स्टारर ‘गदर २’ चा ५२५.७ कोटींचा रेकॉर्ड पार करणे अवघड होईल असे दिसते. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला या सिनेमाचा बजेट 130 कोटी होता, आणि त्याने या बजेटच्या ४ पट अधिक कमाई केली आहे.