छावाने केला 300 कोटींचा आकडा पार!! सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरूच! आठव्या दिवशीच्या कमाईने तोडले मोठे रेकॉर्ड, जाणून घ्या…

मुंबई : सध्या ‘छावा’ सिनेमा सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून दररोजच्या कमाईत वाढ होत आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आठव्या दिवशी २३ कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे त्याची एकूण कमाई २४२.२५ कोटी रुपये झाली आहे. अजूनही हा चित्रपट हाऊसफुल होत असून तिकीट मिळत नाहीत.
विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या जोरदार अभिनयाने हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत आहे. या चित्रपटाने ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. ‘छावा’ सिनेमा रिलीज होऊन आठ दिवस उलटले असताना, त्याच्या कमाईत अजूनही घट होत नाही.
चित्रपटाने पहिले सात दिवस कमाई केली आणि आठव्या दिवशी २३ कोटी रुपये मिळवले. आतापर्यंत ‘छावा’ने ३०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे, आणि आगामी काळात आणखी विक्रमी कमाईची अपेक्षा आहे. अजून बरेच दिवस हा चित्रपट चालेल, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, छावाने ‘जवान’, ‘पठाण’, ‘पुष्पा’ यासारख्या मोठ्या सिनेमांनाही मागे टाकले आहे. यामुळे चित्रपट इंडस्ट्रीत चर्चा सुरु झाली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या दमदार अभिनयासोबत अक्षय खन्नाच्या भूमिकेचेही कौतुक केलं जातं आहे. या सिनेमाने इतर ७ सिनेमांना टक्कर दिली आहे,
तसेच छावा’ सिनेमा रिलीज होऊन आठ दिवस उलटले असताना, त्याच्या कमाईत अजूनही घट होत नाही. हा चित्रपट एक हजार कोटींची घरात जाईल असेही सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या काळात मराठीत देखील हा चित्रपट येणार आहे.