Chhattisgarh : सुरक्षा दलाची मोठी कारवाई, छत्तीसगडमध्ये चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद..


Chhattisgarh : छत्तीसगडमधील अबुझमरहमध्‍ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. येथे झालेल्‍या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले आहेत.

चकमकीत एक जवान शहीद झाला असून, दाेघे जण जखमी आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

तसेच अबुझमदच्या जंगलात नक्षलींनी आश्रय घेतला असल्‍याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी सीमावर्ती जिल्ह्यांमध्‍ये संयुक्त शोध मोहिम राबवली.

अबुझमदच्या कुतुल फरसाबेदा कोडामेटा भागात अद्‍याप चकमक सुरु आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील माडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

नारायणपूर-कोंडागाव-कांकेर-दंतेवाडामधील डीआरजी, एसटीएफ,आणि ITBP 53 व्या बटालियनचे सैन्य या संयुक्त कारवाईत सहभागी आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!