Chhatrapati Sambhajiraje : महाराष्ट्र स्वराज्य पक्ष!! संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला नवी ओळख, निवडणूक आयोगाकडून पक्ष अन् चिन्ह ठरलं!


Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षासाठी एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे. छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटना आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून ओळखला जाणार आहे.

भारतीय निवडणूक आयोगाकडे त्या बाबत नोंदणी करण्यात आली असून पक्षाला आता निवडणूक चिन्ह देखील मिळाले आहे. अशी माहिती पक्षाचे सर्वेसर्वा छत्रपती संभाजीराजे आणि सरचिटणीस धनंजय जाधव यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटनेला आता निवडणूक आयोगाने सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह दिले आहे. त्यामुळे स्वराज्य संघटना आता अधिकृतपणे पक्ष म्हणून नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने ही मान्यता दिली आहे.

त्यामुळे आजपासून स्वराज्य संघटनेचे रूपांतर अधिकृतपणे एका राजकीय पक्षात आज झाले असल्याची माहिती पक्षाचे सर्वेसर्वा छत्रपती संभाजीराजे यांनी समाज माध्यमांवर एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. Chhatrapati Sambhajiraje

पूर्वी तलवार हे ताकदीचे प्रतीक होते. आताच्या काळात लेखणी ही ताकदीची प्रतीक म्हणून ओळखली जाते. जेव्हा तलवारीने लढाया जिंकायच्या होत्या, तेव्हा आम्ही तलवारीने त्या जिंकल्या. आता लेखणीने लढाया जिंकण्याचा काळ आलेला आहे.

तर या काळात लेखणीने अर्थातच, सप्तकिरणांसह पेनाची निब या निवडणूक चिन्हाने आम्ही निवडणुका जिंकू हा आत्मविश्वास व्यक्त करतो. स्वराज्य पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना व मतदारांना शुभेच्छा देतो आणि आपला पक्ष व चिन्ह प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवावे, ही विनंती करत असल्याचे आवाहनही छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!