Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील १४ जणांना उत्तर प्रदेश एटीएसची नोटीस; विघातक हालचालींचा संशय…


Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील १४ जणांना उत्तरप्रदेश एटीएसने नोटीस बजावली आहे. १५ ते १८ जानेवारीदरम्यान लखनौमधील एटीएस मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना देखील या नोटीसीत देण्यात आल्या आहेत.

जानेवारी महिन्यात होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात एका संघटनेची सप्टेंबर महिन्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीत जानेवारी महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाविरोधात कट रचून मोहीम चालवण्यासंदर्भात चर्चा पार पडली असल्याचे काही पुरावे मिळाल्याने उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने ही कारवाई केली आहे.

अधिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये जानेवारी महिन्यात होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात एका संघटनेची सप्टेंबर महिन्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीत कार्यक्रमाविरोधात कट रचून मोहीम चालवण्यासंदर्भात चर्चा पार पडली.

तर, या बैठकीचे तांत्रिक पुरावे तेलंगणा पोलिसांना मिळाले होते. तर, अयोध्येमधील धार्मिक स्थळांबाबत उल्लेख बैठकीत झाल्याने तेलंगणा पोलिसांनी तत्काळ ते पुरावे उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाकडे पाठवले. बैठकीचे पुरावे मिळताच उत्तर प्रदेश एटीएसने ऑक्टोबरमध्ये गुन्हा दाखल केला होता. Chhatrapati Sambhajinagar News

दरम्यान, याच प्रकरणी उत्तर प्रदेशचे एटीएस पथक शहरात तपासासाठी आले होते, आणि यावेळी त्यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या शहरातील १४ जणांना नोटीस बजावली असलयाची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!