Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याकडून शरद पवारांच्या तुतारीचा प्रचार? बड्या नेत्याचा आरोपाने राजकीय भूकंप…


Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यातून मोठी राजकीय बातमी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे लोकसभा निवडणुकी दरम्यान महायुतीत खळबळ उडाली आहे.

आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ असल्याचे सुहास कांदे यांनी म्हटले आहे. दरम्यान सुहास कांदे यांचे आरोप छगन भुजबळ यांनी फेटाळले आहेत. भुजबळांवर टीका केल्याने त्याला मीडियात जास्त प्रसिद्धी मिळते, म्हणून कांदे असे वक्तव्य करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमदार सुहास कांदे म्हणाले, नांदगाव मतदार संघातून जास्त मते भारती पवार यांना मिळाले तर त्याचे श्रेय आम्हाला आणि शिवसेनेला जाणार आहे. हे श्रेय आम्हाला मिळू नये, यामुळे छगन भुजबळ तुतारीचा (राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार) प्रचार करत आहेत. Chhagan Bhujbal

राष्ट्रवादी पक्ष जाणूनबजून तुतारी पक्ष चालवत आहेत. त्यांचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचा दात वेगळे आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्याचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आले आहेत, असा दावा सुहास कांदे यांनी केला आहे.

भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या…

छगन भुजबळ महायुतीचा धर्म न पाळता नाशिकच्या नांदगाव तालुक्यात विरोधी असलेल्या ‘तुतारी ‘ या चिन्हाचा प्रचार व प्रसार करीत आहेत. मंत्रीपदे महायुतीकडून घ्यायची अन् प्रचार आणि प्रसार मात्र विरोधकांचा करायचा. महायुतीचा धर्म पाळत नसाल तर मंत्री भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देवून खुशाल ‘ तुतारी ‘ वाजवावी असे आव्हान सुहास कांदे यांनी केले आहे.

दरम्यान, भुजबळांचे निकटवर्तीय असलेले विनोद शेलार भगरे यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. भास्कर भगरे मतदार संघात प्रचार करीत असताना भेट घेतली असल्याचे समोर आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!