प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2025 अर्जाच्या अंतिम तारीखेत बदल, जाणून घ्या नवीन बदल…

नवी दिल्ली : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2025 अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे इच्छुकांसाठी ही एक महत्वाची माहिती आहे. यामध्ये युवा उमेदवारांना भारतातील शीर्ष कंपन्यांमध्ये 12 महिन्यांच्या इंटर्नशिपची संधी मिळते. यासाठी मासिक 5,000 स्टायपेंड आणि 6,000 एकरकमी अनुदान दिले जाते.
यासाठी शैक्षणिक पात्रता आहे. किमान 10वी उत्तीर्ण. आयआयटी आणि आयआयएम सारख्या प्रमुख संस्थांचे पदवीधर आणि सीए व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवार पात्र नाहीत. तसेच वय 21 ते 24 वर्षे असे असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे. सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबांचे सदस्य पात्र नाहीत. तसेच भारताच्या शीर्ष कंपन्यांमध्ये 12 महिन्यांची प्रत्यक्ष कार्यानुभव.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, www.pminternship.mca.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यामध्ये अनेक फायदे देखील आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण. यासाठी अधिकृत वेबसाइटला भेटू देऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. www.pminternship.mca.gov.in.
नोंदणी तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट करा आणि पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही, आणि प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या अर्जाच्या आधारे एक रिझ्युमे तयार केले जाईल.