भगीरथ भालकेंसाठी चंद्रशेखर राव यांनी पाठवले चार्टड विमान, राष्ट्रवादीला बसला मोठा धक्का…


पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेस नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैद्राबादकडे पोहचले आहेत. केसीआर यांनी भालके यांच्यासाठी सोलापूरमध्ये खास विमान पाठवले होते. यामुळे ते पक्षप्रवेश करतील हे जवळपास निश्चित झाले आहे.

जागेची नोंद उताऱ्यावरलावण्यासाठी ५० हजाराच्या लाचेची मागणी! वाघोली तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक

ते मुख्यमंत्री केसीआर यांच्या भेट घेणार आहेत. भगीरथ भालके हे २०२४ मध्ये भारत राष्ट्र समिती या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लव्ह जिहादबाबत शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले, लव्ह जिहादपेक्षा मोठ

राव यांच्यासोबतच्या या भेटीत काय काय ठरतं, यावर बरंच काही अवलंबून आहे. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीचं निमित्त साधून भगीरथ भालके यांनी शक्तीप्रदर्शन करत आपली भूमिका जाहीर केली होती. त्यात त्यांनी विधानसभेची आगामी निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल ठरला त्या दोघांच्या आयुष्यातला शेवट, नवरा-बायकोमध्ये मोबाईलवरून भांडण, नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..

शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांना भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!