Chandrakant Patil : न आवडणारी सून कालांतराने कुटूंबाची….! चंद्रकांत पाटलांचे आढळरावांच्या उमेदवारीवर थेट भाष्य..
Chandrakant Patil : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच शिरूर लोकसभेत अजित पवारांनी शिवाजी आढळरावांना उमेदवारी दिली. त्यानंतर केवळ राष्ट्रवादीत नव्हे तर भाजपमध्ये ही खदखद निर्माण झाली आहे.
हीच खदखद दूर करण्यासाठी महायुतीची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंतांच्या उपस्थितीत पार पडली. त्याचनुषंगाने दोन्ही नेत्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता महायुतीत खदखद असल्याची कबुली दोघांनी ही दिली. तर एखाद्या मुलाने कुटुंबाला न आवडणाऱ्या मुलीशी लग्न केले.
तर काही दिवस कुटुंबात खदखद असतेच, पण कालांतराने ती सून कुटुंबाची आवडती बनते, असे भाष्य आढळरावांच्या प्रवेशाने निर्माण झालेल्या खदखदीवर चंद्रकांत पाटलांनी केले. तर भाजपमधील नाराज पदाधिकाऱ्यांना चंद्रकांत दादांच्या उपस्थितीने संकेत मिळालेले आहेत. त्यामुळे महायुती पुढच्या टप्प्यात जोमाने प्रचार करतील, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. Chandrakant Patil
कुटुंबातील एका मुलाने न कुटुंबाला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केले. काही दिवस खदखद असते, पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते, असं उदाहरण देत चंद्रकांत पाटलांनी खदखद दूर झाल्याचे सांगितले. अजूनही चाळीस दिवस आहेत. या छोट्या-छोट्या चुका सुधारल्या जातील. घटना घडली की त्यात सुधारणा करत जाऊ,असंही त्यांनी स्पष्ट केलं.
प्रत्येक कुटुंबातील रक्ताच्या नात्यात ही कुरघोडी सुरूच असते. त्यामुळं हे वाद संपविण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुखाची असते. इथं तर वेगवेगळ्या पक्षातून आलेले कार्यकर्ते-पदाधिकारी आहेत. त्यांची ध्येय-धोरणं आहेत, त्यामुळं तेवढं चालायचं, म्हणत चंद्रकांत पाटलांनी अनेक मुद्यांवर सारवासारव केली.