चैन स्नॅचींग करणाऱ्या चोरट्यांना केले अटक, १ लाख १० हजार रुपयांचा माल जप्त


लोणी काळभोर : चैन स्नॅचींग करणाऱ्या दोन चोरटयांना अटक करून त्यांच्याकडून १ लाख १० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सचिन अर्जुन ढगे (वय १९, रा. कदम बंगल्याजवळ, माऊली नगर, कात्रज, पुणे) व रोहित राजु माने (वय २५, रा. निंबाळकर वस्ती, दत्त मंदिराजवळ, कात्रज, पुणे) या़ंना अटक करण्यात आली आहे.

२९ जुन रोजी सायंकाळी ५/३० वाजण्याच्या सुमारा़स थेऊर (ता. हवेली) येथे संगिता पंडीत बोडके (वय ४८, रा. बोडके वस्ती, काकडे मळा रोड) या बोडके वस्ती येथील निलेश किराणा स्टोअर्स या दुकानावर किराणा माल आणण्यासाठी गेल्या होत्या. खरेदी करीत असताना त्याठिकाणी काळया रंगाचे स्प्लेंडर दुचाकीवरुन दोन इसम आले व त्यांनी दुकानावर चिक्की खरेदी करण्याचा बहाणा करुन सदर महिलेच्या गळयातील १० ग्रॅम (१ तोळे) वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावुन दुचाकीवरुन पळुन गेले होते.

सदर बाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात २९ जुन रोजी दोन अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करणेत आला आहे. दाखल गुन्हयाचे तपासादरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीसांनी आरोपींचा असंख्य सीसीटीव्ही कॅमेरे तसेच त्यांचे गोपनिय बातमीदार यांचे मदतीने कौशल्यपुर्णरित्या तपास करुन यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवुन त्यांची नावे निष्पन्न केले.

त्या दोघांपैकी सचिन ढगे यास १४ जुलै रोजी दाखल गुन्हयात अटक केली असुन रोहित माने याला १५ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. अटक मुदतीत नमुद आरोपीत इसमांकडे सहा. पोलीस निरीक्षक श्रीकृष्णा बाबर व त्यांचे पथकाने सखोल तपास केला असता आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुल करुन त्यांनी गुन्हयात चोरलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व गुन्हयात वापरलेली स्प्लेंडर गाडी काढुन दिल्याने पोलीसांनी ते पंचनाम्याने जप्त केले आहे.

वास्तवीक पाहता सदर गुन्हा अज्ञात आरोपीतांविरुध्द दाखल असताना तसेच सदर आरोपीबाबत काहीएक उपयुक्त माहिती प्राप्त झालेली नसताना देखील लोणी काळभोर पोलीसांनी अविरत प्रयत्न करुन, असंख्य कॅमेरे पडताळुन आरोपींची नावे निष्पन्न करण्याचे दृष्टीने प्रभावीरित्या व कौशल्यपुर्ण तपास केला व आरोपीची नावे निष्पन्न करुन, त्यांना अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

तसेच आरोपींकडुन गुन्हयातील चोरीस गेलेले मंगळसुत्र देखील आरोपींकडुन हस्तगत केले आहे. सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्णा बाबर, पोलीस हवालदार सातपुते, वणवे, भोसले, माने, जगदाळे, देवीकर, कुंभार, गाडे, कर्डीले, सोनवणे, शिरगिरे, दडस, पाटील, कुदळे, विर, थोरात यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!