धक्कादायक! खरेदी विक्रीचा दस्त करताना खोटा दाखला तयार करुन फसवणुक, हर्ष आनंद डेव्हलपर्सचे किशोर कोंढरे, सूर्यकांत वाघमारे आणि श्रीकांत आंबवले यांच्यावर गुन्हा दाखल…

पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव येथे फसवणूकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील मिळकतीवर बांधकाम करणार्यात आलेल्या ज्योतिबा आंगन या इमारतीतील सदनिकांचे खरेदी-विक्री दस्त करताना हा फसवणूकीचा प्रकार घडला. याठिकाणी दस्ताचा भाग केलेल्या नियमितीकरण दाखला बनावट तयार करुन त्याचा वापरुन मालमत्तेचे हस्तांतर करुन शासनाची फसवणुक करण्यात आली आहे.
यामुळे याप्रकरणी करणार्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास सुरू आहे. याप्रकरणी सह दुय्यम निबंधक संजय रामचंद्र चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्ष आनंद डेव्हलपर्स तर्फे आंबेगाव बु़. येथे ज्योतिबा आंगन या नावाने इमारतीचे बांधकाम करण्यात आले.
दरम्यान, या इमारतीतील सदनिकांचे खरेदी -विक्री दस्त करताना दस्ताचा भाग केलेला नियमितीकरण दाखला बनावट तयार केला. त्याचा वापरुन त्याआधारे या इमारतीमधील सदनिका, मालमत्तेचे हस्तांतर करुन आर्थिक लाभ घेऊन फसवणूक केली गेली. हा प्रकार उघडकीस आल्याने मोठा गोंधळ उडाला.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके तपास करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी हर्ष आनंद डेव्हलपर्सचे भागीदार किशोर विनायक कोंढरे (वय ४६, रा. दत्तनगर, आंबेगाव), श्रीकांत दत्तात्रय आंबवले (वय ४१, रा. दत्तनगर, आंबेगाव) आणि सूर्यकांत मधुकर वाघमारे (वय ३५, रा. मधुराज बिल्डिंग, वाघमारे चाळ, बावधन खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, हा प्रकार एरंडवणे येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक २२ येथे २६ डिसेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान घडला. याबाबत अधिकचा तपास सुरू असून याप्रकरणी अजून काही नावे पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.