Cabinet Meeting : मंत्रीमंडळ बैठकीतून मराठवाड्याला मोठे गिफ्ट, मुख्यमंत्र्यांकडून ‘एवढया’ हजार कोटींच्या विकासकामांची घोषणा


Cabinet Meeting छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) महत्वाची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. (Cabinet Meeting)

मराठवाड्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी ही बैठक झाल्याचे सांगत मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातील लोकांना न्याय देण्यासाठीचे अनेक निर्णय बैठकीमध्ये घेतल्याचे ते म्हणाले.

बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंचन प्रकल्पावर १४ हजार कोटी खर्च करणार असल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकामासाठी १२ हजार ९३८ कोटी, ग्रामविकाससाठी १ हजार १९१ कोटी, कृषीविभागासाठी ७०९ कोटी, तसेच वैद्यकीय विभागासाठी ४९८ कोटी खर्च करणार असल्याची घोषणा केली.

आजच्या बैठकीत मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींपेक्षा जास्त प्रकल्पांचा निर्णय झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही अधिकृत नावे केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान बैठकीच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ही बैठक होऊ नये यासाठी विरोधकांनी प्रयत्न केला, जो स्वतः काहीच काहीच करीत नाही, ते केवळ नाव ठेवायचं काम करतात, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!