राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?, कारण ..


मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा वस्तार होईल. त्यानंतर महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागणार असल्याची माहिती आहे.

पाण्याच्या टाकीने केला घात! टाकीत पडून उरुळी कांचन येथे दीड वर्षीय मुलाचा मृत्यू

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रात मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे. केंद्रातून हिरवा कंदील दाखवल्यानंतरच राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी उत्सुक असलेल्या नेत्यांना आणखीन काही दिवस वाट बघावी लागणार आहे .

वेगावर ठेवा मर्यादा! राज्यात वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत तब्बल एवढ्या लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू

तसेच मंत्रीमंडळात स्थान मिळवण्यासाठी भाजपच्या इच्छुक आमदारांनी दिल्ली रबारी दाद मागितल्याने मंत्रीमंडळ विस्तार आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची चर्चा आहे. मंत्रीमंडळात स्थान मिळवण्यासाठी सध्या बरेच आमदार फिल्डिंग लावून आहेत.

हॉर्न वाजवल्याने पुण्यात तरूणाकडून कारचालकाला बेदम मारहाण; मारहाण करतानाच व्हिडीओ व्हायरल

शिवसेनेतील मंत्रीपदाची यादी जवळपास निश्चित झाली आहे. मात्र भाजपमध्ये बहुतांश निर्णय हे दिल्लीतून आदेश आल्यानंतर होतात. त्यामुळे भाजपची यादी अद्याप फायनल न झाल्यामुळे मंत्रीमंडळचा विस्तार काही दिवस पुढे ढकलला जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाचा हवाला देत, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, आमदार, मंत्री, पक्षाच्या पदाधिका-यांना मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्याचा अधिकार नाही.

बच्चू कडूंना मिळाला मंत्रिमंडळाचा दर्जा, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

हे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आहेत. दोघांनीही वेळोवेळी मंत्रिमंडळ विस्तार लवकर करू असे सांगितले आहे. त्यामुळे आम्हालाही वाटते आहे, कोर्ट केसेसच्या ज्या काही अडचणी होत्या, त्या दूर झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. असे देसाई म्हणाले.

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!