हॉर्न वाजवल्याने पुण्यात तरूणाकडून कारचालकाला बेदम मारहाण; मारहाण करतानाच व्हिडीओ व्हायरल

पुणे : कारचालकाने हॉर्न वाजवल्याचा राग आला म्हणून पुण्यातील एका बुलेट दुचाकी चालकाने कारचालकाला जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना खराडी बायपास येथे घडली आहे.

सुनील ओमप्रकाश राणा असं मारहाण झालेल्या तरूणाचं नाव आहे. याप्रकरणी पीडित तरूणाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
मिळलेल्या माहिती नुसार, राणा हे चिंबळी फाटा येथे कामानिमित्त कारने जात होते. जनक दर्गा परिसरात सिग्नल असल्यामुळे ते थांबले होते. कारसमोर पांढऱ्या रंगाची बुलेट गाडी होती. तर त्या बुलेटवर एक तरूणी आणि एक तरूण बसला होता.

ती बुलेट सारखी मागेपुढे करत असल्यामुळे कारचालकाने हॉर्न वाजवला. बुलेटवर बसलेल्या तरूणीला त्याचा राग आल्याने तिने कारचालकाला शिवीगाळ केली. त्यानंतर बुलेट चालकाने चारचाकी गाडीचा आरसा काढला आणि कारचालकाला मारहाण केली.

या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच या मारहाणीमध्ये कारचालक जबर जखमी झाला असून त्याने याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.