पुण्यातला सीए बाबा पुरुष भक्तांवर करायचा बलात्कार!! समलैंगिक रूप आले समोर, घटनेने भक्त हादरले…


पुणे : येथील एका भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असे या भोंदूबाबाचे नाव आहे. तो स्वतःकडे दिव्यशक्ती असल्याचा दावा करत अनेकांशी फसवणूक करत होता. याबाबत तपास केला असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे त्याच्या भक्तांना धक्काच बसला आहे.

हा बाबा हिडन मोबाईल अ‍ॅपद्वारे भक्तांच्या खाजगी आयुष्यावर नजर ठेवत त्यांचा मानसिक आणि आर्थिक छळ करत होता. या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. यामुळे पोलीस त्याला अटक केली आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपी बाबाच्या मोबाईल आणि वापरलेल्या अँपची कसून चौकशी करण्यात आली आहे.

भक्तांचे चित्रीकरण कोठे साठवले जात होते, याचा शोध घेण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. हे चित्रीकरण कुठे बाहेर दिले जात होते का? याचा देखील तपास केला जात आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. अशा प्रकारच्या बाबांपासून सावध राहावे.

कोणतीही अंधश्रद्धा ठेवू नये आणि आपली गोपनीय माहिती किंवा मोबाईल कोणालाही देऊ नये. असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे. तसेच बाबाने फसवणूक केली असल्यास घाबरून न जाता समोर येऊन तक्रार द्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या बाबाने मोबाईलमध्ये एक हिडन ॲप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवला.

फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या घटनांवर लक्ष ठेवले. तसेच फिर्यादीला अश्लील कृत्य, त्याच बरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेने या बाबाच्या भक्तांना एकच धक्का बसला असून प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अनेकांची चौकशी सध्या सुरू आहे.

आपल्याकडे येणाऱ्या भक्तांच्या मोबाईल मध्ये चोरून एक अँप डाऊनलोड करून त्याचे खाजगी क्षण पाहणारा पुण्यातील सुस भागातील मठात राहणारा प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार याचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. हा बाबा समलैंगिक असल्याचे समोर आले असून, त्याने अनेक पुरूष भक्तांशी समलैंगिक संबंध ठेवल्याचे व जबरदस्तीने बलात्कार केल्याचे समोर येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!